आमची माहिती

आमची माहिती

पुणे मराठी ग्रंथालय संस्था – एक ज्ञानाचा दीपस्तंभ

पुणे मराठी ग्रंथालय संस्था पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून वाचनसंस्कृतीच्या संवर्धनासाठी कार्यरत आहे. वाचक, विद्यार्थी, साहित्यिक आणि समाजातील विविध घटकांना दर्जेदार ग्रंथसंपदा व विविध ज्ञानसेवा उपलब्ध करून देणे हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

संस्थेमध्ये ग्रंथ व पुस्तके देवघेव, नियतकालिके, मुक्तद्वार वाचनालय, बालविभाग, अभ्यासिका आणि संदर्भ सेवा असे विविध विभाग कार्यरत आहेत.

संस्थेकडे मराठी भाषेतील ललित वाङ्मय तसेच विविध विषयांवरील सुमारे १,७५,००० हून अधिक ग्रंथांची समृद्ध ग्रंथसंपदा आहे. यासोबतच गेल्या १०० वर्षांतील मराठी नियतकालिकांचा संग्रह हा संस्थेकडे असलेला एक अमूल्य ठेवा आहे.

अभ्यासिका

सन १९६२ पासून संस्थेच्या जागेत विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. केवळ ५ विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या या अभ्यासिका विभागाचे आज सुमारे १,१०० विद्यार्थी सभासद आहेत. दिवसातील १४ तास हा विभाग विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असतो. गेल्या ४८ वर्षांत सुमारे ५०,००० विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.

बालवाचनालय

गेल्या ३२ वर्षांपासून दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत पुणे शहरातील २० ठिकाणी वासंतिक मोफत बालवाचनालये चालविली जातात. तसेच गतवर्षापासून पुणे जिल्ह्यातही २० ठिकाणी मोफत बालवाचनालये चालविली जात आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून बालवाचकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याचा आणि वाचनसंस्कृती रुजविण्याचा संस्थेचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे.

ग्रंथदेवघेव केंद्रे

वाचनाची सुविधा अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचावी यासाठी पुणे परिसरात ६ ठिकाणी ग्रंथदेवघेव केंद्रे चालविली जातात. या केंद्रांमुळे विविध भागांतील वाचकांना संस्थेच्या ग्रंथसेवेचा सहज लाभ घेता येतो.

साहित्यिक आणि वाचक यांच्यातील संवाद

वाचक आणि साहित्यिक यांच्यात थेट संवाद घडवून आणण्यासाठी संस्था विविध उपक्रमांचे आयोजन करते. व्याख्याने, परिसंवाद, वाचकसभा, पुरस्कार वितरण तसेच विविध साहित्यिक कार्यक्रमांच्या माध्यमातून साहित्य आणि वाचक यांच्यातील नाते अधिक दृढ करण्याचा संस्थेचा प्रयत्न असतो. या उपक्रमांमुळे समाजातील अनेक मान्यवरांचा संस्थेशी घनिष्ठ संबंध निर्माण झाला असून तो सातत्याने वृद्धिंगत होत आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

संस्थेचा दैनंदिन कारभार तसेच ग्रंथपालनाचे काम संगणकाद्वारे केले जाते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे सभासदांना ग्रंथालयाच्या सेवा अधिक सुलभ, जलद आणि प्रभावीपणे उपलब्ध होतात.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद

पुणे मराठी ग्रंथालयाच्या यजमानपदाखाली सन १९९० मध्ये ६३ वे आणि सन २००२ मध्ये ७५ वे (अमृतमहोत्सवी) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. ही दोन्ही संमेलने संस्थेच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यातील महत्त्वपूर्ण पर्व ठरली.

0 K

Students Enrolled

0 K

Enrollment forms

0

Online Instructors

0

Countries

पुरस्कार आणि सन्मान

सार्वजनिक ग्रंथालय क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण आणि समाजावर परिणामकारक कार्य करण्याची परंपरा पुणे मराठी ग्रंथालयाने सातत्याने जपली आहे. सेवाभावनेला महत्त्व देऊन कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या योगदानामुळे संस्था सतत वृद्धिंगत होत राहिली आणि तिला व्यापक नावलौकिक प्राप्त झाला.

या कार्याची दखल घेत संस्थेला विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

🏆 हिंदुस्थानातील सर्वोत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार – २००३

राजा राममोहनरॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता (केंद्र सरकारचा उपक्रम) यांच्या तर्फे सन २००३ चा हिंदुस्थानातील सर्वोत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार पुणे मराठी ग्रंथालयास प्राप्त झाला.

🏆 डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार – २०११-१२

महाराष्ट्र शासनातर्फे सार्वजनिक ग्रंथालयांना प्रदान करण्यात येणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार सन २०११-१२ या वर्षासाठी पुणे मराठी ग्रंथालयास प्रदान करण्यात आला.

🏆 सर्वोत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार – २०१८

शतकोत्तर ग्रंथालयांच्या संमेलनात, विशेष उल्लेखनीय, अभिनव आणि वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम व योजनांसाठी सन २०१८ चा सर्वोत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालयाचा पुरस्कार पुणे मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे यांच्या वतीने पुणे मराठी ग्रंथालयास समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.

Our Team

Meet Our Teachersline-img

Mina Hollace

Teaches Interior Design

Annette Black

Teaches Interior Design

Kathryn Murphy

Teaches Interior Design

Leslie Alexander

Teaches Interior Design

Who will
You Learn With? line-img

You can list your partners or instructors's brands here to show off your site's